पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांचे कोविड-१९ लसीकरण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. उद्या बुधवार दि.०७ जुलै २०२१ रोजी लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बुधवार दि.०७ जुलै २०२१ रोजी बंद राहणार आहेत.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने यासंदर्भात माहिती दिली. त्यात म्हटले आहे की, कोविड १९ या आजारावर केंद्र शासन व राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सुचनांप्रमाणे दि.१६ जानेवारी २०२१ पासून आरोग्य कर्मचारी (HCW), दि.०२ फेब्रुवारी पासून आघाडीचे कर्मचारी (FLW),दि.०१ मार्च २०२१ पासून ६० वर्षावरील नागरिकांचे लसीकरण तसेच दि.०१ एप्रिल २०२१ पासून ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण आणि दि.०१ मे २०२१ पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.
शासन मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांचे कोविड-१९ लसीकरण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. उद्या बुधवार दि.०७ जुलै २०२१ रोजी लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बुधवार दि.०७ जुलै २०२१ रोजी बंद राहणार आहेत.





















Join Our Whatsapp Group