पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रीय प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय पंच चंद्रशेखर कुदळे यांचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या शहरातील खेळाडूंचाही गुणगौरव पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने करण्यात आला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, महिला व बाल कल्याण समिती सभापती चंदा लोखंडे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्य संदीप वाघेरे, शैलेश मोरे, नगरसदस्य अनुराधा गोरखे, योगिता नागरगोजे, निर्मला गायकवाड, क्रीडा विभागाचे उपआयुक्त संदीप खोत, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, संजय नागपुरे, शितल मारणे, क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहराने अनेक जिल्हा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविले असून त्यांच्या दैदिप्यमान कामगिरीमुळे शहराच्या नाववलौकिकात भर पडली असल्याचे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड मनपा परिसरातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेले खेळाडू तसेच प्रशिक्षक यांची माहिती पुढील प्रमाणे
| अ.क्र | खेळाडूची नावे | खेळाची माहीती |
| १ | विवेक मालशे, भांडारपाल पि.सी.एम.सी | All India Cricket Association of Deaf या संघटनेच्या सहसचिव पदी निवड |
| २ | तेजस्वी काटे, लॉनटेनिस | ५ वी एशियन स्पर्धा – ब्राँझ पदकखुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा – ४ वेळा सहभाग४ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग |
| ३ | वैष्णवी जगताप, जलतरण (दिव्यांग खेळाडू) | एशियन युथ पॅरा गेम – सहभागकॉमनवेल्थ वेल्थ गेम –6th positionराष्ट्रीय स्पर्धेत – २१ सुवर्ण पदक, ३ रोप्य पदक, ४ ब्राँझ पदकराज्यस्तर स्पर्धेत – १९ सुवर्ण पदक |
| ४ | मंगेश कदम, डिकॅथलॉन (मैदानी) | राष्ट्रीय स्पर्धेत- ४ वेळा सहभागी३१ वी जागतिक विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड |
| ५ | चंद्रशेखर कुदळे | राष्ट्रीय प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय पंच |
| ६ | रूस्तम पठाण, पी.सी.एम.सी क्रीडा विभाग | राष्ट्रीय खेळाडू, पोलवॉल्टराष्ट्रीय प्रशिक्षक |
| ७ | श्वेता कदम, रोलबॉल | १७ वी सिनिअर राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राची कर्णधार – स्पर्धेत द्वितीय क्रमांक |
| ८ | वैष्णवी कुलकर्णी, रोलबॉल | १७ वी सिनिअर राष्ट्रीय स्पर्धेत – स्पर्धेत द्वितीय क्रमांक |
| ९ | रफीक इनामदार | राष्ट्रीय प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय पंच |
| १० | स्वराज राजेंद्र मोरे स्केटींग व सायकलिंग | स्केटींग -६ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत – १ रौप्य व २ कांस्य १३ वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभागसायकलिंग४ वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग१ वेळा विद्यापीठ स्पर्धेत सहभाग |
| ११ | पियुष दयाराम क्षिरसागर, रोलबॉलव रोलरहॉकी | मेजर ध्यानचंद पुरस्कार २०२०रोलबॉल२ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग१ वेळा शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सहभागरोलर हॉकी१ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागआईस हॉकीभारतीय संघासाठी निवड |
| १२ | अनिकेत हरोले (पिस्तुल) | २ वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग१ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग |
| १३ | ईशा सारसर (पिस्तुल) | ६ वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग२ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभागपिंपरी चिंचवड महापौरचषक १ सुवर्णपदक |
| १४ | चिन्मय घांगुर्डे (पिस्तुल) | २ वेळा राज्यस्तर स्पर्धेत १ कांस्य१ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग |
| १५ | यशराज जवळकर (पिस्तुल) | ४वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग१ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग |
| १६ | मेहेक शेख (पिस्तुल) | २वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग१ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग |
| १७ | आर्या सोनवणे (पिस्तुल) | २वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग१ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग |
| १८ | श्वेता वाळूंज (पिस्तुल) | २ वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग१ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग |
| १९ | गजानन खंडागळे (रायफल) | २ वेळा राज्यस्तर स्पर्धेत १ सुवर्ण १ कांस्य१ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग |
| २० | तन्मय राईलकर (रायफल) | ४वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग१ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग |
| २१ | आरोही पूर्णेये (रायफल) | ४वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग१ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग |
| २२ | रिया पाटील (रायफल) | २ वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग |
| २३ | यजत नारखेडे (रायफल) | ४वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग |
| २४ | पार्थ माने (रायफल) | २ वेळा राज्यस्तर स्पर्धेत १ सुवर्ण १ कांस्य१ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग |
| २५ | अर्जून कदम (रायफल) | २वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग१ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग |
| २६ | संवेदना खांबे (प्रशिक्षक) | राष्ट्रीय खेळाडू१५ वेळा राष्ट्रीय स्पर्धत १ सुवर्ण, २ रोप्यपदक, १ कांस्य पदक२५ वेळा भारतीय निवड चाचणी स्पर्धेत सहभाग |
| २७ | सौरभ साळवणे (मुख्य प्रशिक्षक) | राष्ट्रीय खेळाडूआंतरराष्ट्रीय रेफरीप्रशिक्षण दिलेले खेळाडू१) ६ खेळाडू भारतीय संघात सहभागी२) ६०+ भारतीय संघ निवड चाचणी३) २००+ राष्ट्रीय खेळाडू४) ४५०+ राज्यस्तरीय खेळाडू |
शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महापालिका नेहमी प्रयत्नशील असते. विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करताना शहरातील उदयोन्मुख खेळाडूंना देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या. सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केला त्याला सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला असून खेळाडूंनी आपली खिलाडू वृत्ती जोपासावी तसेच त्यांना भविष्यातील कामगिरीसाठीही शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मान्यवरांचे आभार माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.





















Join Our Whatsapp Group