पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या संयुक्त स्वातंत्रदिनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष हरिदास नायर यांनी दिली.
दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता श्रीकृष्ण मंदिरात हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी आयुर्वेदीक आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. रक्तदान शिबीर सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत होईल. तर तपासणी शिबीर सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहिल.
यावेळी क्लबचे प्रांतपाल हेमंत नाईक, उप प्रांतपाल राजेश कोठावदे, माजी प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, दीपक शहा, बीएल जोशी, शरदचंद्र पाटणकर आदी उपस्थित राहणार आहेत. शहरातील ३८ लायन्स क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य देखील यावेळी सहभागी होणार आहेत.






















Join Our Whatsapp Group