पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडी ते गणेशनगर येथील पुलाचे डांबरीकरण करण्यात यावे. तसेच रस्त्यावर विद्युत दिवे बसविण्यात यावेत अशी मागणी पिंपरी युवासेनेकडून करण्यात आली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विनायक ढाकणे यांना पिंपरी युवासेना युवा अधिकारी निलेश हाके यांनी निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, फुगेवाडी ते गणेशनगर येथे जोडलेल्या पुलावरील डांबरीकरण निसरडे झाले असून त्या ठिकाणी वारंवार अपघात होतात. त्याठिकाणी पावसाळ्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर पुलावरील डांबरीकरण करण्यात यावे.
तसेच पुलाच्या मध्यभागी असलेल्या पादचारी जिन्यावरुन रात्रीच्या वेळेस अंधार असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन चढ उतार करावा लागतो. तरी सुरक्षेच्या दृष्टीने त्याठिकाणी विद्युत दिवे बसविण्यात यावे अशी मागणी अतिरिक्त आयुक्त विनायक ढाकणे यांना पिंपरी युवासेना युवा अधिकारी निलेश हाके यांच्या वतीने करण्यात आली आहे.






















Join Our Whatsapp Group