पिंपरी (Pclive7.com):- दिशा सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षपदी जगन्नाथ उर्फ नाना शिवले सर यांची निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष गोरख भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्याध्यक्ष सचिन साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सदस्यांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
यावेळी नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी संतोष बाबर, सचिवपदी संतोष निंबाळकर, खजिनदारपदी नंदकुमार कांबळे आणि कार्याध्यक्षपदी राजेंद्र करपे यांचा समावेश आहे.
दिशा सोशल फाउंडेशनची स्थापना एप्रिल 2006 मध्ये झालेली असून गेल्या 15 वर्षांत संस्थेमार्फत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रकट मुलाखती, साहित्यिक आपल्या भेटीला, संवाद तरुणाईशी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशा उपक्रमाबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामजिक, शैक्षणिक, आरोग्य या विविध क्षेत्रातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.