पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपचे आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी दुकाने नव्हे, तर मॉल उभारले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले.
पवार यांच्या त्या टिकेचा संदर्भ देत भाजपा नगरसेवक संदिप वाघेरे म्हणाले की, भाजप आमदारांच्या मॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची दुकाने आहेत, चिरीमिरी दिली की राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गप्प बसतात. विरोध करीत नाहीत, असा हल्लाबोल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासमोरच केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपची सुत्रे आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे आहेत. त्यांच्याविरोधात पक्षातील नगरसेवकाने बंड पुकारले आहे. त्यामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण तापले आहे.






















Join Our Whatsapp Group