पिंपरी (Pclive7.com):- सालाबाद प्रमाणे फुल विक्रेत्यांची घबाडषष्ठी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वर्षभरातील व्यवहार सुरळीत करण्यात आले. तसेच दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांना बोनस तसेच शेतकऱ्यांचा जुना व्यवहार पुर्ण करण्यात आला.
घबाडषष्टीच्या दिवशी फुल व्यापारी दुकानातील काटा माप, बीलबुक, वर्षभरातील थकबाकी हिशोब करून व्यवहार सुरळीत करतात. आपल्या दुकानाला फूलांचे आकर्षक तोरण बांधून सजावट करून घबाडषष्ठी साजरी करण्यात आली असे फुल विक्रेते गणेश आहेर यांनी सांगितले.
यावेळी फूल बाजाराचे अध्यक्ष राजकुमार मोरे, बाजार समिती विभागप्रमूख राजु शिंदे साहेब, दत्ताञय फुले, शिवाजी सस्ते, गणेश आहेर, बाबा रासकर, संजय बोडके, मिना आहेर, सुनील काळे, दत्तात्रय ठक्कर, बाबा तापकिर, मामा राक्षे, नितीन रासकर, अजय हांडभर, प्रणित बडदे, बाळु वाघोले, संतोष जाधव, संतोष फुले, शाम मांडगे उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group