चिंचवड (Pclive7.com):- रहाटणी येथील कै. गबाजी थोपटे प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विनामुल्य ॲक्युप्रेशर थेरपी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
ॲक्युप्रेशर थेरेपीच्या मदतीने शरीराला विना औषधी निरोगी बनवाण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ही थेरपी अनेक आजारांवर मात करते. दहा वर्षाच्या बालकापासून ते ९० वर्षाच्या जेष्ठ नागरिकांकरिता या थेरपीचा उपयोग होऊ शकतो.
या शिबीराचे आयोजन २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कैलास थोपटे जनसंपर्क कार्यालय, कुणाल हॉटेल शेजारी रहाटणी येथे करण्यात आले आहे.
तरी या शिबीराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक कैलास थोपटे आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष कुणाल थोपटे यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group