पिंपरी (Pclive7.com):- राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (आज) विधानसभेत शक्ती कायदा एकमताने मंजूर झाला. हा कायदा मंजूर करण्यात आल्याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याचे सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.

महापौर उषा ढोरे अध्यक्षस्थानी होत्या. शिवसेनेच्या सदस्या मीनल यादव यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. ज्येष्ठ नेत्या वैशाली काळभोर यांनी अनुमोदन दिले.
यावेळी वैशाली काळभोर म्हणाल्या, महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी फाशीसारख्या कठोर शिक्षेची तरतूद असलेला ‘शक्ती’कायदा विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील महिलांना एकप्रकारे सुरक्षाकवच मिळणार आहे.





















Join Our Whatsapp Group