पिंपरी (Pclive7.com):- सरत्या वर्षाला निरोप देतानाच नववर्षाचे स्वागत करताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे वाहनचालकांना महागात पडले. अशा बेशिस्त ७९१ वाहनचालकांवर कारवाई झाली.

नाकाबंदीत लहान ५६४ तर मोठी ६१२ अशा एकूण ११७६ वाहनांची तपासणी केली, पोलिसांनी या कारवाईत एकूण ५ लाख ३७ हजार ६०० रुपयांचा दंड आकारला. ‘थर्टीफर्स्ट’ निमित्त शहरात चौकाचौकांत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता.
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध लागू केले. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस सज्ज झाले आहे. दरम्यान ३१ डिसेंबरला नववर्ष स्वागत करण्यासाठी जल्लोष करण्यात आला. यातील काही जण धांगडधिंगा करून नियमांचे उल्लंघन करतात. तसेच काही जण मद्यपान करून व वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून वाहने चालवितात. त्यामुळे रस्ते अपघात होतात. या प्रकारांना रोखण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी परिसरामध्ये चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहनांची कसून तपासणी होत होती.
वाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई
■ कारवाई एकूण खटले दंड (रुपये)
● विना हेल्मेट – १५५ – ७७५००
● विना सिटबेल्ट – २०६ – २१२००
● ओव्हर स्पीड – ६९ – १४२०००
● सिग्नल जम्पिंग – १३३ – ६९५००
● बुलेट सायलेन्सर – २८ – २८०००
● रिक्षा कारवाई – ७८ – ४८९००
● काळी काच – २०५ – १४४५००
● जामर कारवाई – ०२ –
● ड्रंक अँण्ड ड्राईव्ह – ०३ –
● विनामास्क – १२ – ६०००
थर्टीफर्स्टसाठी शहरात चोख बंदोबस्त होता. मद्यपी तसेच बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. नाकाबंदीदरम्यान वाहनांचीही कसून तपासणी करण्यात आली. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. त्यामुळे रस्ते अपघात कमी होण्यास तसेच वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होईल.
– आनंद भोईटे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा






















Join Our Whatsapp Group