पिंपरी (Pclive7.com):- दि.०३ जानेवारी, २०२२ पासून वय वर्षे १५ ते १८ वयोगटामधील (जन्माचे वर्ष सन २००७ व त्यापुर्वीचे) मुलांचे कोविड १९ लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. याबाबत केंद्र शासनामार्फत सुचित करण्यात आलेले आहे. वय वर्षे १५ ते १८ या वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन ही लस दिली जाणार आहे.

दि. ०१ जानेवारी, २०२२ पासून कोविन पोर्टलवर नोंदणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. लाभार्थी स्वतः नोंदणी करू शकतात किंवा नोंदणीकरीता यापूर्वी कोविन पोर्टलवर असलेल्या खात्याद्वारे ऑनलाईन पध्दतीने किंवा युनिक मोबाईल नंबरद्वारे नवीन खाते तयार करून देखील नोंदणी करू शकतात. ही सुविधा सध्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.
दि.३ जानेवारी, २०२२ पासुन १५ ते १८ वयोगटामधील (जन्माचे वर्ष सन २००७ व त्यापुर्वीचे) लाभाथ्यांचे पिंपरी चिंचवड मनपाच्या खालील नमुद लसीकरण केंद्रामध्ये मोफत लसीकरण केले जाणार आहे. सदर कामी ऑनलाईन पध्दतीने पुर्वनियोजित वेळ (Appointment/ Slot Booking) घेणे करीताची सुविधा www.cowin.gov.in या कोविन पोर्टलवर दि.०३ जानेवारी, २०२२ रोजी सकाळी ०८.०० वाजता खालील नमुद लसीकरण केंद्रामध्ये उपलब्ध असेल.

तरी सदर लसीकरणाचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकिय विभागामार्फत करण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group