पिंपरी (Pclive7.com):- सप्तर्षी फाउंडेशन, रहाटणी व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी पुणे यांच्यातर्फे दि.०९ जानेवारी रोजी लक्ष्मीबाई बारणे उद्यान, वाकड येथे विशेष (दिव्यांग) मुलांकरीता मोफत होमिओपॅथी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन सविता खुळे- सभापती, महिला व बालकल्याण पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पोलीस निरीक्षक संतोष पाटील (गुन्हे शाखा, वाकड पोलीस स्टेशन), गोपाळ माळेकर- स्विकृत नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मिलिंद करंजकर मनोचिकित्सा विभाग, जिल्हा रुग्णालय, सांगवी या मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. सदर शिबिरास मान्यवरांनी उपस्थित राहून सप्तर्षी फाउंडेशन सतत करत असलेल्या विविध समाजोपयोगी कार्यासाठी सप्तर्षी फाउंडेशनला प्रोत्साहन दिले व पुढील कार्याकरिता शुभेच्छा दिल्या.
तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, नगरसेवक नाना काटे, बापू काटे, बाबा त्रिभुवन, मयूर कलाटे, अभिषेक बारणे, कैलास बारणे, चंद्रकांत नखाते, उन्नती फाउंडेशनचे संजय भिसे, स्विकृत नगरसेवक संदीप नखाते यांचे कार्यक्रमाला सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
दिव्यांग मुलांचा संभाळ करण्यामध्ये पालकांचा वेळ, ऊर्जा, पैसा व काही प्रमाणात आशा संपुष्टात आलेली असते, अशा पालकांसाठी सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी यांनी आशेचा किरण निर्माण केला आहे. ऑगस्ट २०२१ पासून सुरू केलेल्या या प्रयत्ना अंतर्गत शेकडो दिव्यांगांच्या कुटुंबांना खूप मोठा आधार सप्तर्षी फाउंडेशन च्या माध्यमातून मिळाला आहे.
सदर उपक्रमाअंतर्गत नोंदणी झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कायमस्वरूपी उपचार दिले जातात. नोंदणी झाल्याशिवाय शिबिरास प्रवेश दिला जात नसल्याने गर्दी टाळूनही शेकडो लाभार्थी लाभ घेत आहे. सदर शिबिरात कोरोना संदर्भात योग्य ती दक्षता घेतली जाते. या शिबिरात विशेष (दिव्यांग) मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच मोफत औषधे देण्यात आली. शिबिरामध्ये शंभर पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
सदर शिबिर कै.डॉ. प्रफुल्ल विजयकर सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केले जाते. कै.डॉ. प्रफुल्ल विजयकर सर यांनी 2005 साली सेवा भावातून विशेष मुलांसाठी महाबळेश्वर येथे चॅरिटेबल होमिओपॅथिक कॅम्पची सुरुवात केली. आज पर्यंत विजयकर सरांमुळे हजारो विशेष मुलांना निस्वार्थ भावनेतून शास्त्रशुद्ध होमिओपॅथी उपचार घेता आले आहेत.
या शिबिरात लाभ घेतलेल्या दिव्यांग मुलांच्या पालकांचे अभिप्राय
संजय चोपडे – दिव्यांग लाभार्थी – प्रणव चोपडेसप्तर्षी फाउंडेशन यांनी चालवलेला हा उपक्रम फारच कौतुकास्पद आहे. यामुळे माझ्यासारख्या पालकांना आपल्या पाल्यामध्ये काहीतरी चांगले होईल याची आशा निर्माण झाली आहे. येथील डॉक्टर व सहयोगी स्टाफ यांचे सर्वांचे सहकार्य अतिशय चांगले आहे. माझ्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा, सप्तर्षी फाउंडेशन व डॉक्टरांचे आभार.
रवींद्र तोडकरी – दिव्यांग लाभार्थी – रुद्र तोडकरीसप्तर्षी फाउंडेशन सोबत माझा संपर्क मागील सहा वर्षांपासून आहे. फाउंडेशनचे काम खूपच चांगले आहे दिव्यांगासाठी ते एक संजीवनी चे काम करत आहे. प्रत्येक आयोजित कार्यक्रमांमध्ये त्यांचे योगदान नियोजनबद्ध असते, कोणालाही गैरसोय होणार नाही याची ते काळजी घेतात. डॉक्टरांचे ही विशेष आभार त्यांची ट्रीटमेंट सकारात्मक लागू होत आहे, याचा फायदा माझा पाल्य रुद्र रवींद्र तोडकरी यास झालेला आहे, निशुल्क ट्रीटमेंट साठी सप्तर्षी फाऊंडेशनचे मनःपूर्वक आभार.
पांडुरंग किसन घुगे – दिव्यांग लाभार्थी – प्राजक्ता घुगेसप्तर्षी फाउंडेशनचा हा उपक्रम अतिशय स्तुती करण्यास योग्य आहे. अतिशय मनापासून येथे पालकांची काळजी घेतली जाते. वेळोवेळी घेतलेल्या शिबीर व इतर योजनांसाठी असलेली व्यवस्था अतिशय व्यवस्थित आहे. शिबिरातील औषधांचा माझ्या कन्येला फायदा झाला आहे. हे फाउंडेशन दिव्यांगांसाठी करत असलेले काम उल्लेखनीय आहे. या उपक्रमाला आम्हा पालकांना देखील काहीतरी हातभार लावता आला तर नक्कीच आनंद, आम्ही यासाठी नेहमी तत्पर आहोत.
या शिबिरात प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी तर्फे डॉ. रजत मालोकार, डॉ.निवेदिता हांडे, डॉ. प्रियांका धमाळ, डॉ. नीरज कुलकर्णी, डॉ.रोहित देशमुख, डॉ. दिप्ती मालोकार, डॉ.आश्लेषा देशमुख, डॉ.श्रद्धा लांजेवार व सहायक डॉ. अनुक्रमे सौम्य चतुर्वेदी, शिवानी पाल, शिवप्रताप सिंग, होनी ओसवाल, सिमरन जाधव, मुग्धा दिवाकर इत्यादी डॉक्टर उपस्थित होते.
सप्तर्षी फाउंडेशनचे संस्थापक सचिव मनोजकुमार बोरसे, विशाल पवार, विशाल घंदुरे, मच्छिंद्र वीर, नंदकुमार आहेर, समीना काझी, श्रद्धा नगरे, जयश्री डांगे संस्थेच्या वतीने उपस्थित होते.
पालक प्रतिनिधी मधून स्वयंसेवक सतीश ढगे, महेश चौधरी, संतोष कांबळे, रविंद्र तोडकरी व स्वयंसेवक कु. साक्षी भाट, कु. हर्षल सुरूशे, कु. शुभम पिंपळे, कु. वैशाली नारखेडे, कु. तनुजा सुरवसे, कु. निशा जाधव, विकास दुरकर इत्यादी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group