पिंपरी (Pclive7.com):- तरुण पिढीला देशोधडीला लावण्याचे काम ठाकरे सरकारचे सुरू आहे अशी टिका भाजपाचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली आहे. राज्य सरकारने किरणा दुकानात व मॉलमध्ये ‘वाईन’ विक्रीचा निर्णय घेतला. त्यानंतर अमित गोरखे यांची ही टिका केलीय.
अमित गोरखे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, एकीकडे कोरोनाचे निर्बंध लागू असताना महाराष्ट्रात ठाकरे सरकारने वाईन किराणामाल व मॉलमध्ये सहजरीत्या कोणालाही मिळू शकते, हा निर्णय केला. या निर्णयाला सर्व स्तरातून कडाडून विरोध होत आहे. कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थ्यांना सहजगत्या कुठेही वाईन उपलब्ध होऊ शकणार आहे.
या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? कारण सरकार ही आपल्या आर्थिक उत्पादन वाढवण्यासाठी येणाऱ्या पिढीचे भविष्य अंधारात टाकत आहे. मॉलमध्ये जाणारे अनेक तरुण वर्ग आहेत. आज त्यांनी मॉल मध्ये दारू विकण्याची परवानगी दिलेली आहे. तर भविष्यात हे मॉल व दुकानमध्ये दारू पिण्याची परवानगी देतील. त्यामुळे या राज्यातील तरुण वर्ग दारूच्या आहारी गेल्याशिवाय राहणार नाही.
कारण अडीच ते तीन वर्षापासून त्यांनी शिक्षणाचे दारं बंद करून ठेवलेले आहेत. तसेच महाराष्ट्राला दारिद्र्यात खेचण्याचे निर्णय सरकारने घेतला आहे. गरीब विद्यार्थ्यांना, युवकांना शिक्षण नाही. टॅब नाही या कडे लक्ष द्यायचे सोडून, असले निर्णय सरकार कसे घेऊ शकते? पालक वर्गातून यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहे. या निर्णयाचा मी जाहीर निषेध करतो व ताबडतोब हा निर्णय मागे घ्यावा असे आवाहन अमित गोरखे यांनी राज्य सरकारला केले आहे.

























Join Our Whatsapp Group