डुडुळगाव-मोशी प्रभाग क्र.४ मध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी (Pclive7.com):- टाटा मोटर्स कामगार प्रतिनिधी योगेश बबन तळेकर यांच्या पुढाकारातून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डुडुळगाव-मोशीमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम रविवार दिनांक ०६ फेब्रुवारी रोजी अंडबंगनाथ महाराज मंदिर जवळ राबवण्यात आली. डुडुळगाव-मोशी-गंधर्व नगरी ग्रामस्थ, सर्व सोसायटीतील जेष्ठ नागरिक, महिला, तरुण वर्ग व १५ ते १८ वयोगटातील मुलांनी या लसीकरणाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
संपूर्ण मानव जातीवर कोरोनाचे संकट आले असून यातून कसाबसा मार्ग काढत आपण पुढे जात आहोत. बहुतांश नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ही समाधानकारक बाब असली तरी राहिलेल्या नागरिकांचे लसीकरण होणे काळाची गरज आहे. त्यासाठीच याठिकाणी एक दिवसीय लसीकरण मोहीम राबवण्यात आली.
यावेळी टाटा मोटर्सचे युनियन अध्यक्ष सचिनभैय्या लांडगे म्हणाले की, डुडुळगाव-मोशी-गंधर्वनगरी मधील नागरिकांच्या काळजीपोटी जनसेवक टाटा मोटर्स युनियन प्रतिनिधी योगेश तळेकर यांच्या पुढाकारातून या ठिकाणी लसीकरण घेणे ही अभिमानाची बाब आहे. नागरिकांची सुरक्षा घेण्यासाठी संपूर्ण प्रभागात १०० टक्के लसीकरण करण्याचा त्यांचा संकल्प होता. त्यास नागरिकांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
या एक दिवसीय लसीकरण मोहिमेस विष्णू वहिले, तानाजी तळेकर, बबन पवार, तानाजी पवार, विठ्ठल तळेकर, सूर्यकांत तळेकर, हनीफभाई शेख, काळूराम वहिले, सचिन वहिले, हनुमंत धोंडीबा तळेकर, राजु तळेकर, पंडित तळेकर, विक्रम वहिले, स्वप्निल चोरघे, नूरमोहम्मद शेख, राहुल तळेकर, उमेश तळेकर, प्रदीप तळेकर, विनोद तळेकर, संदीप तळेकर, वैभव तळेकर, सागर तळेकर, प्रतिक तळेकर, रविराज मोरे, ओंकार धायरकर, शुभम धायरकर, गिरीश तळेकर, निखिल चोरघे, दिनेश सस्ते, आशपाक शेख, मयूर तळेकर, अक्षय बनकर, किशोर तळेकर, स्वप्निल तळेकर, स्वप्निल गवळी, धीरज तळेकर व समस्त ग्रामस्थ डुडुळगाव-मोशी-गंधर्वनगरी सर्व सोसायटी मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.