प्रभाग क्र.१२ – घरकुल, शरदनगर, हरगुडेवस्ती, नेवाळेवस्ती, भीमशक्तीनगर मधील १३७५ तरूणांचा महोत्सवात सहभाग
पिंपरी (Pclive7.com):- सामाजिक कार्यकर्त्या सौ. किर्ती मारुती जाधव यांच्या वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रभाग क्र.१२ – घरकुल, शरदनगर, हरगुडेवस्ती, नेवाळेवस्ती, भीमशक्तीनगर मधील तरुणांसाठी किर्तीताई जाधव युवा मंच’ यांच्या वतीने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या नोकरी महोत्सवाला परिसरातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रभाग क्र.१२ घरकुल, शरदनगर, हरगुडेवस्ती, नेवाळेवस्ती, भीमशक्तीनगर व साने चौक परिसरातील १३७५ तरुणांनी या महोत्सवात सहभाग नोंदवला. त्यातील ५६९ तरुणांना महोत्सवामध्ये नोकरीसाठी पात्र करण्यात आले.

या महोत्सवास भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांनी विशेष हजेरी लावली. यावेळी विशाल गरड, किशोर पवार, वेंकटेश पवार, अक्षय ओव्हळ, विकास चव्हाण, सतीश क्षीरसागर, अविनाश काळे, अतुल काळोखे, धनंजय जाधव, अमोल औसरमल, संतोष स्वामी, विश्वास केदारी, शुभम काळे, अमोल देवरे, रोहन पवार, संतोष जाधव यांनी कार्यक्रम घेण्यासाठी परिश्रम घेतले.

गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या काळात असंख्य तरुणांना नोकरी गमवावी लागली होती. परंतु सौ.किर्ती मारुती जाधव यांच्या या उपक्रमामुळे तरुणांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत होत होत. अश्या सामाजिक उपक्रमामुळे किर्तीताईंचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.

परिसरातील कोणत्याही गरजू तरुण, तरुणांना नोकरी मिळत नसेल तर त्यांनी अवश्य संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी 9503093322 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान सौ. किर्ती मारुती जाधव यांनी केले आहे.
Tags: bjplatest marathi newsMahesh LandgeMarathi NewsPCLIVE7.COMPimpri Chinchwadआमदार महेश लांडगेकिर्तीताई जाधवनोकरी महोत्सवपिंपरी चिंचवडप्रभाग क्र.१२






















Join Our Whatsapp Group