पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे निलख येथील भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी आज (दि.२४) त्यांच्या नगरसेवक पदाचा राजीनामा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे दिला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठी गळती लागली असून गेल्या दहा दिवसात तीन नगरसेवकांनी भाजपाला रामराम ठोकला आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मुख्य प्रवक्ते योगेश बहल, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे उपस्थित होते.
नगरसेवक तुषार कामठे यांनी गेल्या पाच वर्षांत महापालिकेतील भाजपाच्या चुकिच्या कामां विरोधात आवाज उठविला आहे. तरुण, हुशार, अभ्यासू नगरसेवक अशी कामठे यांची ओळख आहे. पिंपळे निलख प्रभागातून पहिल्यांदाच ते भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र येत्या निवडणुकीत त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत जाणार असल्याचे संकेत दिलेत.





















Join Our Whatsapp Group