पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा गुरूवार दि.१० मार्च २०२२ रोजी बंद राहणार आहे. रावेत येथील जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरूस्तीच्या कामे गुरूवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा गुरूवारी सकाळचा पाणी पुरवठा नियमित होईल, तर सायंकाळचा होणारा पाणी पुरवठी बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी दि.११ रोजी सकाळी अनियमित पाणीपुरवठा होईल अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध, जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, तसे सेक्टर क्र.२३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे. शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे गुरुवार दि.१०/०३/२०२२ रोजी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे दि.१०/०३/२०२२ रोजी महापालिके मार्फत होणारा सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि.११/०३/२०२२ रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी मनपा कडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता यांनी केले आहे.