पिंपरी (Pclive7.com):- महिला सक्षमीकरणासाठी पिंपरी युवासेनेने उचललेले पाऊल योग्य असल्याचे मत पिंपरी चिंचवड युवासेना प्रमुख विश्वाजीत बारणे यांनी व्यक्त केले. महिला दिनाचे औचित्य साधत पिंपरी युवाअधिकारी निलेश हाके यांच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. प्रभागातील महिलांना मोफत संगणक प्रशिक्षण व इंग्रजी टायपींग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्या प्रसंगी दापोडी, फुगेवाडी भागातील ८६ महिलांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड युवासेना प्रमुख विश्वजीत बारणे व पिंपरी-चिंचवड शहर संघटिका शिवसेना उर्मिलाताई काळभोर व जेनेसिस इंडिया चे ऍड.अजित बोराडे यांच्या उपस्थितीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे वाचनालय दापोडी येथे झाले.
त्याप्रसंगी मार्गदर्शक करत मनोगत व्यक्त करताना पिंपरी युवाअधिकारी निलेश हाके म्हणाले आज उच्चशिक्षित असूनही चुल आणी मुल यात गुरफटलेल्या माझ्या माता,भगिनींना वेळात वेळ काढून संगणकीयदृष्या सक्षम व्हावे. आज इंग्रजी लिहणे, वाचणे काळाची गरज आहे. या दृष्टिकोनातून या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्वांनी लाभ घ्यावा. तसेच प्रशिक्षणानंतर महापालिकेच्या नागरवस्ती विभागात संगणक प्रशिक्षित महिलांना संगणक मिळवण्यासाठी प्रयत्न करनार असल्याचे यावेळी निलेश हाके यांनी सांगितले.
त्याप्रसंगी पिंपरी-चिंचवड युवासेना सन्मवयक रुपेश कदम, विभाग प्रमुख उमेश पाटील, उपविभाग प्रमुख एकनाथ हाके, महिला विभाग संघटिका कोमल ताई जाधव, शिवसेना शाखाप्रमुख स्वप्नील शेवाळे, गोपाळभाऊ मोरे, अविनाश जाधव, चिंचपा निंगडोळे, अजय कदम, मनोज काची, रोहित गोरे उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group