विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
पिंपरी (Pclive7.com):- इंद्रायणीनगर येथील श्री साई चौक मित्र मंडळ व विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित सार्वजनिक शिव जयंती उत्सवा निमित्त शिवकाल ते स्वातंत्र्य काळ नाणी, शिवशस्रगाथा, इतिहासाचे मुक साक्षीदार वीरगळ, सतीशिळा व शिवकालीन युद्ध कलेतून इतिहास समजण्यास नक्की मदत होईल असे मत उद्योजक भाजपा चिंचवड विधानसभा प्रभारी शंकर जगताप, कामगार नेते सचिन लांडगे यांनी व्यक्त केले.

ते इंद्रायणीनगर येथील श्री साई चौक मित्र मंडळ व विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित सार्वजनिक शिवजयंती उत्सवा निमित्त शिवकाल ते स्वातंत्र्य काळ नाणी, शिवशस्रगाथा, इतिहासाचे मुक साक्षीदार वीरगळ व सतीशिळा प्रदर्शनाचे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, प्रदेश सदस्य व चिंचवड विधानसभा सह प्रभारी संतोष कलाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, नितीन गोडसे, लक्ष्मण पठारे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजक नाणी संग्रहक किरण उत्तमराव करांडे, शिवशस्र संग्रहक संतोष मुरलीधर चंदणे, वीरगळ व सतिशिला संग्रहक अनिल किसन दुधाणे, शिवकालीन युद्धकला व मर्दानी खेळाचे वस्ताद रवींद्र भाऊसाहेब जगदाळे आदी उपस्थित होते.
हे प्रदर्शन शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस राहणार आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी हे प्रदर्शन भरवून शिव जयंती निमित्त परिसरातील नागरिकांना शिव कालीन इतिहास प्रत्यक्षात अनुभवण्यास हातभार लावला आहे. विलास मडिगेरी हे सातत्याने समाजपयोगी उपक्रम राबवित असतात. त्यांचा आदर्श प्रत्येक राज्यकर्त्यांनी घेणे आवश्यक आहे असे मत महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांनी फिरते जनसंपर्क सुरू केले आहे. त्याचे कौतुक खुद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही केले आहे. समाजाप्रती नेहमी सेवेसाठी तत्पर राहत एक आदर्श निर्माण केला आहे.

अबालवृद्ध, विद्यार्थ्यांची मोठी गर्दी
इंद्रायणीनगर येथील श्री साई चौक मित्र मंडळ व विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित सार्वजनिक शिव जयंती उत्सवा निमित्त शिवकाल ते स्वातंत्र्य काळ नाणी, शिवशस्रगाथा, इतिहासाचे मुक साक्षीदार वीरगळ व सतीशिळा व शिवकालीन युद्ध कला पाहण्यासाठी भोसरी परिसरातील अबालवृद्ध, विद्यार्थी, महिला यांनी मोठी गर्दी केली होती.

प्रदर्शन ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा लक्ष वेधून घेत होता
इंद्राणीनगर येथील वैष्णोमाता मंदिर प्रांगणात सुरू असणाऱ्या सार्वजनिक शिव जयंती उत्सवा निमित्त शिवकाल ते स्वातंत्र्य काळ नाणी, शिवशस्रगाथा, इतिहासाचे मुक साक्षीदार वीरगळ व सतीशिळा व शिवकालीन युद्ध कला प्रदर्शनाच्या मध्यभगी ११ फुटी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
Tags: Shivjayantiउमा खापरेपिंपरी चिंचवड भाजपाभाजपाविलास मडिगेरीविलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठानशंकर जगतापशिव जयंतीशिवविचारसचिन लांडगे






















Join Our Whatsapp Group