पुणे (Pclive7.com):- पुण्यात पीएमपीएमएलची वाहतूक ठप्प झाली आहे. सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसची वाहतूक ठप्प झाली आहे. अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. पीएमपीएमएलकडे खासगी ठेकेदारांचे पैसे थकल्यामुळे हा बंद पुकारण्यात आला आहे.

दरम्यान, पीएमपीएमएलच्या खासगी ठेकेदारांना प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली आहे. तसेच मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पीएमपीएमएलच्या खासगी ठेकेदारांनी अचानक बंद पुकारल्याने प्रशासनाने हा इशारा दिला आहे. या बंदमुळे शहरातील जवळपास एक हजार बसेस डेपोत थांबून आहेत. तर नेमक्या कार्यालयाच्या वेळेतच बस मिळत नसल्याने प्रवाशांचेही हाल होत आहेत. नुकताच एसटीचा संप मिटला आहे. त्यादरम्यान प्रवाशांचे हाल झाले होते. आता पुणेकरांना पीएमपी बंदचा फटका सहन करावा लागत आहे.
प्रशासनाला कल्पना देण्यात आली नाही
रात्री बारापर्यंत या संपाची कोणतीही कल्पना प्रशासनाला देण्यात आली नव्हती. खासगी ठेकेदारांचे प्रशासनाकडे काही पैसे थकले आहेत. त्यामुळे संप पुकारल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे. सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसेस सध्या डेपोमध्ये थांबून आहेत. दरम्यान, दुपारपर्यंत यावर तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे.






















Join Our Whatsapp Group