पिंपरी (Pclive7.com):- बुधवारी रात्री राज्यातील पोलीस दलात अनेक फेरबदल करण्यात आले. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली करुन त्यांच्या जागी अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दुसर्या दिवशी तात्काळ पदभार स्वीकारून कामकाज सुरु केले. आयुक्त शिंदे यांनी रूजू होताच पहिल्याच दिवशी सामाजिक सुरक्षा पथक बरखास्त करत दणका दिला आहे. यामुळे पोलीस आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचारी यांची धाबे दणाणले आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर तिसरे पोलीस आयुक्त म्हणून कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती झाली होती. पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी अवैध धंदेवाल्यांना तंबी दिली होती. मी असेपर्यंत दुसरा काम धंदा पहा अन्यथा कारवाईला सामोरे जावा. यासाठी कृष्ण प्रकाश यांनी ‘सामाजिक सुरक्षा’ या विशेष पथकाची स्थापना केली होती.
या पथकात पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करुन शहरातील अवैध धंद्यावर कारवाई सुरु केली होता. कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारल्या पासून ते आज अखेर प्रयत्न या पथकाच्या कारवाया सुरु होत्या. मटका, जुगार, लॉटरी, अवैद्य दारु, वेश्या व्यवसाय, स्पाच्या नावाखाली अवैद्य धंदे, बेटिंग, वाळू उपसा, गुटखा आदी प्रकारच्या कारवाई सुरु होत्या.
दरम्यान कृष्ण प्रकाश यांची बदली झाल्यावर काल दि.२१ एप्रिल रोजी अंकुश शिंदे यांनी पोलीस आयुक्तपदाच्या पदभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी त्यांनी सामाजिक सुरक्षा पथक बरखास्त केले. यामुळे अनेकांना धक्काच बसला आहे. सामाजिक सुरक्षा पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांना तत्काळ मूळ नेमणुकीच्या ठिकाणी कार्यमुक्त होण्याचे आदेश त्यांनी गुरुवारी रात्री उशिरा काढण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त शिंदे यांनी सुरु केलेल्या पहिल्याच दिवशीच्या कामामुळे सर्वच पोलीस अधिकार्यांचे धाबे दणाणले आहे.























Join Our Whatsapp Group