पिंपरी (Pclive7.com):- रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करीत टोळक्याने धुडगूस घातला. ही घटना मध्यरात्री एकच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.

याप्रकरणी सूर्यभान दगडू चोथवे (वय ४०, रा. सृष्टी चौक, पिंपळे गुरव, सांगवी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी त्यांची वाहने नेहमीप्रमाणे रस्त्यावर पार्क केली होती. दरम्यान, रात्री एकच्या सुमारास अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने वाहनांची तोडफोड केली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली होती. आरोपींनी दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.





















Join Our Whatsapp Group