सदरच्या सर्व दाखल्यांवर हिंदू-माळी ही जात नमूद आहे. दक्षता पथकामार्फत चौकशीअंती सदर बाब निष्पन्न झाली आहे. घोलप यांची बहीण अरुणा शंकर खंडागळे यांची पोलिस दक्षता पथकामार्फत चौकशी केली असता, त्यांच्या शाळेच्या रजिस्टरमध्ये हिंदू-माळी ही जात नमूद आहे. इतर जोडलेले पुरावे बनावटरीत्या बनवल्याची खात्री झाली आहे. सदरचा दाखला रद्द करून फौजदारी कारवाईची मागणी पोलिस दक्षता समितीने २८ जुलै २०१७ ला झालेल्या सुनावणीत केली आहे.
त्यामुळे नगरसेविका घोलप यांना जात सिद्ध करण्याबाबत ठोस पुरावे सादर करण्यासाठी उस्मानाबाद जातपडताळणी समितीने २३ ऑगस्ट ही तारीख दिली आहे. त्या दिवशी आवश्यक पुरावे सादर न केल्यास त्यांचे नगरसेवकपद धोक्यात येऊ शकते.
या प्रकरणाबाबत बोलताना नगरसेविका कमल घोलप म्हणाल्या की, जातीसंदर्भातील सर्व ठोस पुरावे आमच्याकडे आहेत. माझा जन्म पिंपळगाव, ता. वाशी, जिल्हा उस्मानाबाद येथील आहे. दुष्काळ असल्याने आमचे कुटुंब कोकणात स्थायिक झाले. त्यामुळे माझी बोलीभाषा अधिक शुद्ध आहे. त्यामुळे विनाकारण माझ्या जातीबाबत तक्रार केली गेली आहे. गावात आमच्या जातीची असंख्य कुटुंबे आहेत. तेथे जाऊन त्यांनी पाहणी केल्यास जातीबाबत शंकेचे निरसन होईल. जातपडताळणी समितीच्या २३ ऑगस्टच्या सुनावणीत खरे-खोटे स्पष्ट होईल.





















Join Our Whatsapp Group