पिंपरी (Pclive7.com):- मंगळवार दि.२१ जुन २०२२ रोजी “आंतरराष्ट्रीय योग दिन” निमित्त सकाळी ६ ते ८.३० यावेळेत शिवछत्रपती लिनियर अर्बन गार्डन, गोविंद-यशदा चौक, पिंपळे सौदागर येथे योग शिबिराचे आयोजन नगरसेवक श्री.शत्रुघ्न (बापू) काटे युथ फाउंडेशन आणि द आर्ट ऑफ लिविंग यांनी संयुक्तपणे केले होते.

यावेळी आर्ट ऑफ लिविंगचे सत्यजित भैया यांनी व्यासपीठावरून भजनाच्या ठेक्यावर योगाचे अनेक प्रकार नागरिकांकडून करून घेतले तसेच “योग करण्याची पद्धती व याचे महत्व” उपस्थितांना आत्मसात करून दिले.
यावेळी बापु काटे म्हणाले कि “काही लोक योग म्हणजे किंवा योगासन म्हणजे शरीराचा व्यायाम समजतात, शरीर ताणने, वाकवणे असे समजतात. परंतु योग म्हणजे शरीराचा व्यायाम नसून, योग हा मानवी मन आणि आत्मा यांची क्षमता जाणून घेणाऱ्या विज्ञानाचा एक भाग आहे. तसेच योगा अभ्यास मानवी जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो. सध्याच्या काळात लोक व्यस्त राहणीमानामुळे समाधान मिळवण्यासाठी योग करतात. योगामुळे व्यक्तीचा ताणतणावच दूर होत नाही तर मन व मेंदूला ही शांती मिळते. रोज योगा केल्याने मानवाचे शरीर निरोगी राहते. शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. शिवाय योगा केल्याने शरीर सर्व रोगांपासून वंचित राहते. या योग कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना व्यायाम व योगाचे महत्व व फायदे निदर्शनास आणून दिल्यास नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.”
तसेच यावेळी आर्यन्स मार्शल आर्टस् इंडिया या क्लासचे काही विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा जिंकून त्यांची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेस निवड झाल्याबद्दल त्यांचे व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडल आणि प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य कोच संतोष म्हात्रे आणि कोच परवेज शेख उपस्थित होते.
यावेळी या योग शिबिरास लहान मुले, स्त्रिया तसेच जेष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला. साधारण ५०० नागरिकांनी या योग शिबिरास उपस्थिती नोंदवली तसेच उपस्थित मान्यवरांना तुळसचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्यजितभैया चड्डा, पवना सह.बँक उपाध्यक्ष जयनाथ काटे, नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे, उद्योजक वसंत काटे, उद्योजक संजय भिसे, इंटक अध्यक्ष कैलास कुंजीर, ऑल सिनियर सिटीजन असोसिएशन मेंबर्स, जेष्ठ नागरिक संघ सदस्य, नवचैतन्य हास्य परिवार मेंबर्स, सौ.अनघा आटले, चंदन चौरसिया, दिपक गांगुर्डे, दिलीप आप्पा काटे आणि नगरसेवक शत्रुघ्न (बापू) युथ फाउंडेशन अध्यक्ष प्रविण कुंजीर आणि सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बिरारी यांनी केले.






















Join Our Whatsapp Group