पिंपरी (Pclive7.com):- नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाजमध्यामावर पोस्ट प्रसारित केल्या प्रकरणी अमरावती येथील उमेश कोल्हे (मेडिकल व्यावसायिक) यांची २१ जूनला व उदयपुर येथील कन्हैयालाल तेली (टेलर) यांची २८ जूनला धर्मांधाकडून गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या निर्घृण हत्येविरोधात संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असून देशभरातून या जिहादी मानसिकतेतून हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. हिंदूंवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल तसेच अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदू समाज एकत्रित रस्त्यावर उतरून जिहादी अतंक्याना फाशी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
“देशभरात असे अनेक जिहादी कारवाया सुरू आहेत, या कारवायांच्या विरोधात अनेक मोर्चे, आंदोलने करून ही जिहादी कारवाया थांबत नाहीत. जिहादी कारवायांना जाणून-बुजून काना डोळा केला जातो. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली जात नाही. त्यामुळे त्यांचे प्रस्त वाढत असल्याचा आरोप सर्व स्तरातून केला जात आहे. या जिहादी आतंक्यांच्या विरोधात सरकारने ठोस पावले उचलून त्यांच्यावर कठोर कारवाई करत फाशीची शिक्षा यावी. जिहादी मानसिकतेकडून देशातील निष्पाप लोकांचा अजून कीती बळी घेणार, उमेश कोल्हे व कन्हैयालाल तेली यांची हत्या करणारा हे दोघेही दहा वर्षांपासून मित्र असल्याचे आणि ज्याने हत्या केली तो उमेश कोल्हे यांच्या अंत्यविधी संस्कारात सहभागी असल्याचे समाजमध्यमांवर बोलले जात आहे. अशा या विकृत मानसिकतेच्या समाजाबरोबर मैत्री करणे कितपत योग्य” असे उपस्थितांना मार्गदर्शन करताना विहिंप, पुणे ग्रामीण विभाग मंत्री नितीन वाटकर यांनी प्रश्न उपस्थित केला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक, एम.एम. शाळा काळेवाडी येथे विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल, काळेवाडी प्रखंड व समस्त हिंदू समाजाच्यावतीने कन्हैयालाल व उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली अर्पण करून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी आपले विचार मांडले.
या प्रसंगी विहिंप पुणे ग्रामीण विभाग मंत्री नितीन वाटकर, चिंचवड जिल्हा मंत्री धनंजय गावडे, जिल्हा धर्मा प्रसार प्रमुख अविनाश कदम, बजरंग दल जिल्हा सह संयोजक युवराज पाटील, काळेवाडी प्रखंड अध्यक्ष दत्ता नढे, प्रखंड संयोजक विवेक निकम, प्रखंड सह संयोजक, प्रभू शेलार, प्रखंड बलोपासना प्रमुख अभिषेक पाडळीकर, महाविद्यालयीन प्रमुख दिग्विजय झांजुर्णे, राजेश मोहिते तसेच हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.