पुणे (प्रतिनिधी):- नवरात्र महोत्सवांतर्गत देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. यात अभिनेता सुबोध भावे आणि क्रिकेटपटू मोना मेश्राम यांच्यासह अन्य मंडळींची नावे आहेत. याची माहिती माजी उपमहापौर आणि पुणे नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली.
महोत्सवाचे अध्यक्ष आणि माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले, कला, संस्कृती, नृत्य, गायन, वादन यांचा मनोहारी संगम असलेल्या पुणे नवरात्र महोत्सवाचे यंदा २३ वे वर्ष साजरे करीत आहे. या महोत्सवाअंतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा श्री लक्ष्मीमाता कला-संस्कृती जीवनगौरव पुरस्काराद्वारे गौरव करण्यात येतो. यंदा अभिनेता सुबोध भावे, भारतीय महिला क्रिकेटपटू मोना मेश्राम, माहिती अधिकार विवेक वेलणकर, भजन -कीर्तनाद्वारे समाजामध्ये प्रबोधन करणारे ह.भ.प. महंत पुरुषोत्तम पाटील आणि लावणी सम्राज्ञी बरखा जळगावकर यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे २१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांनी हा पुणे नवरात्र महोत्सव साजरा होणार असल्याचेही आबा बागुल यांनी सांगितले.





















Join Our Whatsapp Group