पिंपरी (Pclive7.com):- अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शहर परिसरातील चौघांवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मंगळवारी (दि.२६) पिंपरी, चाकण, तळेगाव दाभाडे आणि सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शस्त्रविरोधी पथकातील पोलिस शिपाई मोहसिन युनिस अत्तार यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलगा मंगळवारी सायंकाळी सव्वापाच वाजता नवमहाराष्ट्र शाळेजवळ फिरत असताना त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला.

गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलिस शिपाई योगेश्वर कोळेकर यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ऋषिकेश जयवंत शिंदे (१९, रा. धानोरे, ता. खेड) याला तलवारीसह अटक करण्यात आली आहे. उपनिरीक्षक नाथा केकाण यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रशांत उर्फ परशुराम तानाजी ननावरे (३०, रा. तळेगाव दाभाडे. मूळ रा. सातारा) याला कोयत्यासह अटक केली आहे.
ज्ञानेश्वर बाबुराव मुरकुटे (५८, रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संकेत राजेंद्र मुरकुटे (२१, रा. पिंपळे निलख) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने लोखंडी हत्यार उगारून फिर्यादींना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.





















Join Our Whatsapp Group