पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडच्या माजी नगसेविका, सामाजिक कार्यकर्त्या माया बारणे आणि माजी विरोधी पक्ष नेते संतोष बारणे यांनी कोल्हापूर येथील पुरग्रस्त शेतकऱ्यांना ७ गायी दान केल्या आहेत. यामध्ये ६ गिर गायी आणि १ लाल कंधारी गायीचा समावेश आहे. यापुर्वीही माया बारणे यांनी ज्या शेतकऱ्यांनी मागणी केली अश्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी गायी दान केल्या आहेत.

गेली अनेक वर्ष माया बारणे आणि त्यांचे कुटुंब सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत. गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे कोल्हापुरमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुरामध्ये अनेक शेतकऱ्यांची गुरे वाहून गेली होती. त्यामुळे त्यांना उदारनिर्वाहासाठी कोणतेही साधन राहिले नाही. त्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी माया बारणे यांनी अश्या गरजू शेतकऱ्यांना ७ गायी दान केल्या.
कोल्हापूरमध्ये पुर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले तसेच शेतीचे नुकसान झाले. अनेकांच्या डोक्यावरचे छप्पर उडाले अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन नाहीसे झाले. अश्यावेळी लक्षात आले जे शेतकरी आहेत त्यांना खऱ्या अर्थाने जर सहकार्य करायचे असेल तर एक खारीचा वाटा म्हणुन त्या गरजू शेतकऱ्यांना गो दान करण्याचा निर्णय घेतला असे संतोष बारणे म्हणाले.
गरजू शेतकऱ्यांना दुधाच्या जोड व्यवसायातून त्यांच्या प्रपंचाला हातभात लावता यावा या हेतूने काही गरजू शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती मिळविली. त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार सात गरजू शेतकऱ्यांची निवड करून त्यापैकी काहींना दुभत्या गायी तर काहींना गाभण गायी सुपुर्त केल्या आहेत.– माया बारणे, माजी नगरसेविका
























Join Our Whatsapp Group