वीजवितरण मंडळाने कुटुंबाला ५० लाख रुपयाची भरपाई त्वरित द्यावी;भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- काळभोर नगर मधील तरुण कार्यकर्ते नितीन काशिनाथ मेलाळे (वय वर्ष ३४) यांचे आज सकाळी ७ वाजता विजेच्या खांबाला हात लागल्यामुळे शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा धक्कादायक प्रकार वीजवितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे घडला असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केला आहे.

वीज वितरण मंडळाच्या गलथान कारभारामुळे या युवा तरुणाला जीवाला मुकावे लागले आहे, तरी वीजवितरण कंपनीने या कुटुंबाला त्वरित ५० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. तसेच त्या कुटुंबातील एकाला वीजवितरण कंपनी मध्ये कायमची नोकरी द्यावी अशी मागणी अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कै. नितीन यांच्या मागे त्यांची दोन लहान मुले, पत्नी, आई, वडील व एक लहान भाऊ असे कुटुंब आहे. नितीन हे एका खासगी कंपनीमध्ये काम करत होते. मध्यमवर्गीय कुटुंबातील हा एक उमदा तरुण होता.
























Join Our Whatsapp Group