पिंपरी (Pclive7.com):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन, जयनाथ काटे युथ फाऊंडेशन, उन्नती फाऊंडेशन आणि निर्मलाताई कुटे सोशल फाऊंडेशनमार्फत आज (दि.१४) “तिरंगा सन्मान सायकल रॅलीचे” आयोजन करण्यात होते. पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे या रॅलीला प्रतिसाद दिला. लहान मुले, स्त्रिया आणि जेष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या या राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी या तिरंगा सन्मान सायकल रॅलीत सहभाग घेतला.

यावेळी शत्रुघ्न काटे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करतांना म्हणाले की, आपला राष्ट्रध्वज हे जात, धर्म, वंश, लिंग आणि समाज यांच्या पलीकडे सर्वप्रथम व आपल्या सर्वांच्या अस्मितेचा प्रतीक आहे. आपला हा तिरंगा खूप संघर्ष, आंदोलने, विरांचे बलिदान आणि त्याग यांचे फलित आहे. आपल्या देशाचे अखंडत्व टिकविणारा असा हा तिरंगा झेंडा प्रत्येकाला ऊर्जा प्रदान करत असतो. हि तिरंगा सन्मान सायकल रॅली नागरिकांच्या हृदयात मुख्यतः आजच्या पिढीच्या मुलांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्याबरोबरच राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. म्हणून या राष्ट्रध्वजाचे अपमान होणार नाही याची जातीने खबरदारी घेणे हि प्रत्येकाचे नैतिक कर्त्यव्य आहे.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन मार्फत पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील सोसायटी तसेच गावठाण परीसरात साधारण १५ हजार झेंडे वितरित करण्यात आले. शत्रुघ्न (बापु) काटे यांनी या तिरंगा सन्मान सायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
Tags: तिरंगा सन्मान सायकल रॅलीपिंपळे सौदागररहाटणी - पिंपळे सौदागरशत्रुघ्न काटेशत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनहर घर तिरंगा






















Join Our Whatsapp Group