पिंपरी (प्रतिनिधी):- प्रॉपर्टी कन्संलटंट असलेल्या एका खाजगी संस्थेने देशातील जगण्यासाठी सुयोग्य शहरांची यादी जाहिर केली आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहराचा ५ वा क्रमांक आला आहे.
वाढती लोकसंख्या आणि वाढते जागतिकीकरण यामुळे देशातील अनेक शहरे भकास झाली आहेत. हे सर्व घडत असताना दुसरीकडे मात्र काही शहरांचे नियोजन अतिशय योग्यरित्या झाल्याचे दिसत आहे. त्याचाच एकभाग म्हणून या संस्थेने देशातील सुनियोजित अशा शहरांची एक स्पर्धा घेतली होती. त्यामध्ये पालवा या शहराचा प्रथम क्रमांक आला आहे. तर पिंपरी चिंचवड शहराचा पाचवा क्रमांक आला आहे.
जगण्यासाठी सुयोग्य शहरांच्या या स्पर्धेत १० निकष ठेवण्यात आले होते. त्यामध्ये नियोजन, कनेक्टिव्हीटी, सोयी सुविधा व दैनदिन गरजा, विश्रांती व मनोरंजन, स्मार्ट प्रशासन, सुरक्षितता व निर्भयता, नोकरीच्या संधी, पर्यावरण व शाश्वत विकास, बांधकाम क्षेत्राची कामगिरी, भविष्याचा विस्तार/दृष्टीकोन हे निकष ठेवण्यात आले होते.
या निकषांनुसार झालेल्या स्पर्धेत टॉप टेन शहरे पुढील प्रमाणे – १.पालवा, २. नवी मुंबई, ३. मोहाली (पंजाब), ४. महिंद्रा सिटी (चेन्नई), ५. पिंपरी चिंचवड, ६. राजरहट (कोलकाता), ७. टेक्नोपार्क (त्रिवेंद्रम), ८. मगरपट्टा सिटी (पुणे), ९. ग्रेटर नोयडा, १०. मानेसर.






















Join Our Whatsapp Group