पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरात सध्या नवरात्र उत्सवात विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत परंतु निगडीतील भाजप नगरसेवक उत्तम केंदळे व कमल घोलप यांनी महिला मंडळांना ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश देत प्रभागातील महिलांना रोप वाटपाचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
यमुनानगर येथील तुळजा भवानीमाता मंदिराच्या सांस्कृतिक महिला मंडळापासुन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यावेळी नगरसेवक केंदळे म्हणाले की, महिलांनी पुढाकार घेतला तर कुठल्याही बाबतीत महिला भगिनी यशस्वी कामगिरी करू शकतात यामुळे महिलांनी जास्तीत जास्त सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न करावा, ‘आपलं घर-आपला परिसर’ स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घ्यावा व पर्यावरणाचा विचार करता ‘झाडे लावा झाडे जगवा’ उपक्रम हाती घेवुन झाडांची काळजी घ्यावी, पाण्याच्या वापर काटकसरीने करावा तरच ईश्वरसेवा केल्याचा आनंद प्राप्त होऊ शकतो.
यावेळी यमुनानगर येथील तुळजाभवानी मंदिरात भवानी माता महिला सांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकारी रेखा सुर्वे, रेखा कळसकर, संजीवनी कळसकर, हेमांगी वांजपे, निकिता देशमुख, रेश्मा साळवी, श्रीमती ढवळे व जोशी यांच्यासोबत मोठ्या प्रामानावर महिला भगिनी उपस्थित होत्या.






















Join Our Whatsapp Group