पिंपरी :- श्री साई प्रतिष्ठानच्या वतीने पुणे आळंदी रस्त्यावरील साई मंदिरात दस-यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. दुपारी १२ची माध्यान्हं आरती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी शेकडो भाविक उपस्थित होते.
विजयादशमीनिमित्त्त शनिवारी (दि.३०) पहाटे ५ वाजता काकड आरती, सनई वादन व ७ वाजता श्रींच्या मूर्तीस मंगल स्नान आणि सुर्योदय आरती, ७ ते ९ रुद्राभिषेक, भिक्षा झोळी हे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत आयोजित केलेल्या महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. दुपारी १ नंतर भक्तिसंगीत, नामस्मरण करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता ‘श्रीं’च्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा करण्यात आली. सायंकाळी ७ वा. धुपारती, रात्री ७ ते १० साई भक्तिसंगीताचा कार्यक्रम झाला. या सोहळ्याचा सांगता समारोह रविवारी (दि. १ ऑक्टोबर) रोजीच्या माध्यान्हं आरतीने होणार आहे, अशी माहिती नेलगे यांनी दिली.