पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिव्यांग सेवा पंधरवड्यानिमित्त शहरातील दिव्यांग बांधवांना अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते यूडीआयडी कार्डचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला दिव्यांग कक्षाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, दिव्यांग कक्ष अधिकारी बालाजी गित्ते, शरद फड आदी उपस्थित होते.

सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट म्हणाले, महापालिकेला आत्तापर्यंत समाज कल्याण विभागाकडून महापालिकेला १२९७ यूडीआयडी कार्ड मिळाले आहेत. यापैकी शुक्रवार अखेर ६५० कार्डचे वाटप करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group