पिंपरी (Pclive7.com):- बोपखेल ते गणेशनगर हा रहदारीचा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर चिखल व बांधकामाचा राडारोडा पडलेला आहे. सदरील राडारोडा बाजूलाच सुरु असलेल्या खाजगी बांधकाम व्यावसायिकाच्या नव्याने सुरु होत असलेल्या इमारतींचा आहे.

बांधकामासाठी खोदाई करुन हा चिखल मोठमोठ्या वाहनांमध्ये भरुन रस्त्याच्या बाजूलाच असणाऱ्या मोकळ्या मैदानावर टाकला जात आहे. परंतु हा चिखल सर्व रस्त्यावर पडुन रस्त्याचे विद्रुपीकरण झाले आहे.
त्यामुळे गेली तीन दिवस झाले अनेक दुचाकी वाहने रस्ता निसरडा झाल्यामुळे घसरून अपघात होत आहेत. वाहनचालकांना छोट्या-मोठ्या दुखापती झाल्या आहेत. अतिशय सुंदर असलेल्या रस्त्याचे चित्र या खासगी बांधकाम व्यावसायिकांकडून भयावह व विद्रुप केले जात आहे.

जनतेला नाहक त्रास देणाऱ्या अशा व्यावसायिकांवर कडक कारवाई करावी असे पत्र युवतीसेना पुणे जिल्हा अधिकारी प्रतिक्षा घुले यांच्या वतीने ‘ई’ प्रभाग अधिकारी यांना देण्यात आले आहे. अन्यथा युवासेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ही देण्यात आला. याप्रसंगी विभागप्रमु नामदेव घुले, दक्षता समिती सदस्य रवि कोवे, सामाजिक कार्यकर्ते निलेश बिवाल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags: खासगी बांधकाम व्यावसायिकगणेशनगरप्रतिक्षा घुलेबांधकाम व्यावसायिकावर कारवाईबोपखेलयुवासेनारस्ताराडारोडा






















Join Our Whatsapp Group