पिंपरी (Pclive7.com):- वाकड येथील श्री दत्तकृपा जेष्ठ नागरिक मंडळाची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि.१४ ऑक्टोबर रोजी वेणूनगर विरंगुळा केंद्र येथे मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव रहाटे यांच्या अध्यक्षतेखाली माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती पार पडली.

ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुकरराव रहाटे यांनी मनोगत व अनुभव कथन केले. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी देखील सर्व ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्रातील उत्स्फूर्त अनुभव व्यक्त केले. सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व आनंदात पार पडली.
या सभेत ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचे व सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात ज्या सभासदांचे वाढदिवस होते त्यांचे देखील सत्कार करण्यात आले. तसेच विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल काही सभासदांचे याप्रसंगी सत्कार करण्यात आले. यावेळी रमेशदादा गायकवाड यांचीही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. शेवटी आभार प्रदर्शन व स्नेहभोजन कार्यक्रमानंतर सभेची समाप्ती करण्यात आली.





















Join Our Whatsapp Group