पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीची भोसरी विधानसभेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. संघटना वाढीच्या दृष्टीने विधानसभेत नविन पदनियुक्ती देण्यात आल्या. यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा वैशालीताई नागवडे, महिला निरीक्षक शितलताई हगवणे, पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा प्रा.सौ.कविताताई आल्हाट, माजी महापौर नगरसेविका मंगलाताई कदम, पुणे जिल्हा निरीक्षक लोचनताई शिवले, वरिष्ठ कार्याध्यक्ष कविताताई खराडे, महिला समन्वयक सुप्रियाताई सोळणपुरे, नगरसेविका संगीता नानी ताम्हाणे, गीता ताई मंचरकर, माजी नगरसेवक नारायणजी बहिरवडे, दत्तात्रय जगताप, काशिनाथ जगताप, युवराज पवार आदी मान्यवर व विधानसभेतील महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या बैठकीचे आयोजन भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्योतीताई तापकीर व कार्याध्यक्ष ज्योतीताई गोफणे यांनी केले होते. या बैठकीचा उद्देश म्हणजे महिलांना संघटनेत काम करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या, प्रभागात येणाऱ्या अडचणी व त्यांच्यावर काम कसे करायचे याचे मार्गदर्शन करण्यात आले. पक्ष बांधणी, सभासद नोंदणी हे घरोघरी जाऊन करण्यात यावे, महिलांनी राजकारणात समतोल कसा राखावा प्रामाणिक काम करून कसे पुढे जावे याचे उत्तम मार्गदर्शन माजी महापौर मंगलाताई कदम, विभागीय अध्यक्ष वैशालीताई नागवडे, शहर अध्यक्ष कविताताई आल्हाट यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहराचा विकास अजितदादा पवार यांनी कोणती दूरदृष्टी ठेवून केलायं, हे उत्तम उदाहरण त्यांनी दिले आहे. महिलांना आरक्षण शरद पवार साहेबांनी दिले, त्याचा फायदा करून कसे नेतृत्व करावे असेही त्यांनी सांगितले. या सर्वांच्या मार्गदर्शनाला महिलांनी अतिशय छान प्रतिसाद दिला.