पिंंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महापालिकेचा आज ३५ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त महापालिकेच्या मुख्यालयात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वत: रक्तदान केले. यावेळी त्यांच्यासोबत सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांनी देखील रक्तदान केले. आयुक्त हर्डीकर यांनी यावेळी रक्तदानाचे महत्व पटवून देत सर्वांनीच रक्तदान करावे असे आवाहन केले.
आज महापालिकेचा ३५ वा वर्धापन दिन आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आयुक्त, नगरसेवकांसह अनेक अधिकारी तसेच कर्मचार्यांनी रक्तदान केले.