पिंपरी (Pclive7.com):- युवानेते दीपकभाऊ सपके यांंनी हजारो समर्थकांसह शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दि.२६ रोजी सपके यांनी त्यांच्या समर्थकांसह माजी पोलीस अधिकारी व बार्शी तालुक्याचे प्रस्थ भाऊसाहेब आंधळकर आपल्या बार्शी तालुक्यातील समर्थकांसह शिदे गटात प्रवेश केला.

उल्हासनगर, कल्याण, ठाणे, डोंबिवली येथील युवकांचे प्रेरणास्थान व डीएस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दीपकभाऊ सपके यांचा हजारो समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश झाला. दिपकभाऊ सपके यांचे पिंपरी चिंचवड, नाशिक, पुणे, मुंबई, जळगाव, औरंगाबाद, यवतमाळ जिल्ह्यांसह राज्यभरात अनेक ठिकाणी दीपकभाऊ सपके यांचे मोठे सामाजिक कार्य आहे. यावेळी बोलताना दीपक सपके म्हणाले की, अनेक वर्ष सामाजिक कार्य केल्यानंतर आता राजकीय क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. दिपक सपके यांचा प्रवेश होत असताना अजित नायर, सचिन सपके, हेमंत बचाव, रितेश शिंदे, आदित्य कुलकर्णी व इतर मित्र परिवार उपस्थित होता.
Tags: CM Eknath ShindeDeepak SapakeEknath Shindeदीपकभाऊ सपकेयुवानेतेशिंदे गटात जाहीर प्रवेशहजारो समर्थक





















Join Our Whatsapp Group