पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेतील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्यासाठी दिवाळी फराळ कार्यक्रम आनंदीबाई डोके हॉल, केशवनगर चिंचवड येथे आज (दि.३०) रोजी सकाळी अत्यंत उत्साहात पार पडला.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले, माजी शहरप्रमुख योगेश बाबर, उपजिल्हा संघटिका वैशालीताई मराठी, शिवसेना महिला शहर संघटिका उर्मिलाताई काळभोर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, माजी नगरसेवक संजय दुर्गुळे, चिंचवड विधानसभेतील सर्व आजी – माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन उपशहरप्रमुख हरेश आबा नखाते, विभाग प्रमुख संदीप भालके, विभाग प्रमुख नितीन दर्शले यांनी केल्याबद्दल वरिष्ठ नेत्यांनी कौतुक केले.
























Join Our Whatsapp Group