पिंपरी (Pclive7.com):- निगडी पोलिसांनी आकुर्डी येथील पुणे-मुंबई महामार्गावर धडक कारवाई करत तब्बल ७ लाख ७२ हजार किंमतीची विदेशी दारू जप्त केली. या कारवाईत दारूची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप (MH-25 BL-2789) आणि चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सिल्व्हर सेव्हन हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पुणे-मुंबई महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. आरोपी अनीज रफीक शेख (वय २२, रा. थेरगाव) याच्याकडे विदेशी मद्य वाहतुकीसाठी आवश्यक वैध कागदपत्रे नसल्याचे तपासात आढळून आले.

पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी मद्यसाठा आढळला. त्यानंतर मद्यसाठा आणि वाहन असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास निगडी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.




















Join Our Whatsapp Group