पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रेड झोन क्षेत्राची हद्द तात्काळ कायम करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ऐश्वर्या तरस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेमार्फत रेड झोन क्षेत्राची आवश्यक मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, मोजणी पूर्ण होऊनही अद्याप संबंधित रेड झोनची हद्द अधिकृतपणे निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक, मालमत्ता धारक तसेच विकासकामांचे नियोजन करणाऱ्या संबंधित घटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हद्द निश्चित नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून विविध प्रशासकीय कामेही प्रलंबित राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने पूर्ण झालेल्या मोजणीच्या आधारे रेड झोनची हद्द तातडीने कायम करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी केली आहे. या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ऐश्वर्या तरस यांनी व्यक्त केली आहे.




















Join Our Whatsapp Group