पिंपरी (Pclive7.com):- सालाबाद प्रमाणे पिंपरीतील फुल बाजार आडते संघाच्या वतीने घबाडषष्ठी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

घबाडषष्ठी म्हणजे फुल विक्रेत्यांचा सण फुल विक्रेत्यांच्या बाबतीत दिवाळी लक्ष्मीपुजन प्रमाणे दुकानाची पुजा, काटा माप, हिशोबाची वही, कामगारांची बोनस तसेच शेतकऱ्यांच्या पैशैचा हिशोब आजच्या दिवशी पूर्ण केला जातो.
फटाक्यांची आतषबाजी, रंगीबेरंगी फुलांची तोरण, रांगोळी काढुन दुकानाची सुंदर आशी साजावट केली जाते. व ग्राहकांना मिठाईच वाटप करण्यात येते. अशी माहिती फुल बाजारातील व्यापारी गणेश आहेर यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group