पिंपरी (Pclive7.com):- – पिंपरी चिंचवड सायन्स पार्क मध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी, तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन, जिज्ञासा वाढीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.०१ नोव्हेंबर आणि ०२ नोव्हेंबर रोजी “रोबोट” विषयावरची कार्यशाळा. तसेच गमतीशीर विज्ञान गणितावर आधारीत कार्यशाळा दोन बॅचेस मध्ये १ नोव्हेंबर २०२२ ते २ नोव्हेंबर २०२२ व ४ नोव्हेंबर २०२२ ते ५ नोव्हेंबर २०२२ रोजी साहित्यमूल्य नोंदणीसह संपन्न होणार आहेत. तसेच दि.८ नोव्हेंबर रोजी दिसणारे खग्रास चंद्रग्रहण दुर्बिणीव्दारे पाहण्याची संधी मिळणार आहे.

वरील सर्व उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी, मुलांमुलींनी भाग घ्यावा. लोक आग्रहास्तव दि.३१ ऑक्टोबर २०२२ सोमवार रोजी तसेच दि. ७ नोव्हेंबर २०२२ सोमवार रोजी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क सुरु राहील.
कार्यशाळेसाठी नाव नोंदणी सायन्स पार्क कार्यालयात करता येईल. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. ७७४४९४४३33 तसेच ई-मेल [email protected] यावर संपर्क करावा. असे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी, सायन्स पार्क यांनी आवाहन केले आहे.






















Join Our Whatsapp Group