माजी नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या तक्रारीला सकारात्मक प्रतिसाद
पिंपरी (Pclive7.com):- शाहूनगर, संभाजीनगर, दत्तनगर, विद्यानगर व मोरवाडी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात गळ्यातील चैन चोरणे (Chain skaching), घर फोड्याचे प्रकार होत असून यासाठी पोलीस यांची ग्रस्त वाढवावी त्याचबरोबर खास करून शाहूनगर व संभाजीनगर मध्ये शाळा कॉलेज परिसरात हुल्लडबाजी करणारे तरुण टू व्हीलर वर जोरजोरात हॉर्न देऊन गाडी चालवणे, सायलेन्सर मधून आवाज काढणे, त्याचबरोबर बाईकवर तीन तीन, चार चार जण एकत्र बसून हुल्लड बाजी करणे, असे प्रकार वाढले असून यावर तोडगा काढण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी आज नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून केली.

त्यावेळेस त्यांच्या समवेत नंदा करे तसेच उषा सरोदे व इतर महिला भगिनी उपस्थित होत्या. त्यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या परिसरामध्ये पोलीस गस्त लवकरच वाढवू व असे प्रकार घडू नयेत यासाठी च्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित दिल्या आहेत. श्रीमती अनुराधा गोरखे यांनी आयुक्त तसेच पोलिसांचे आभार मानले आहेत.
Tags: Ankush ShindeAnuradha GorakheMorwadiPimpri Chinchwad CP Ankush Shindepolice commissionerPolice PetrolingSambhajinagarShahunagar























Join Our Whatsapp Group