पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील आण्णा भाऊ साठे बस स्टॉप ठिकाणी रेड झोन एरियामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत शौचालय व चार दुकान गाळा बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कारवाई करण्यात येत नाही, म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या निवासस्थानी बुधवारी (दि.७) थाळीनाद आंदोलन करण्यात येणार होते. मात्र हे आंदोलन करण्यापूर्वीच पोलीसांनी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती देताना सचिन काळभोर यांनी म्हटले आहे की, २४ नोव्हेंबर रोजी चिचंवड येथील महापालिकेच्या स्मार्टसिटी कार्यालयाबाहेर या प्रकरणी लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. मात्र, त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी अंतर्गत १५ वर्ष करारनामा करून विनामूल्य जागा देण्यात आली. त्या ठिकाणी रेड झोन एरियामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत बेकायदेशीर बांधकाम करून शौचालय व चार दुकान गाळा बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले.
त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. रेड झोन एरियामध्ये बेकादेशीर बांधकाम केल्याप्रकरणी सामान्य नागरिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन कारवाईचा बडगा उगारला आहे, तर दुसरीकडे स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन रेड झोन एरियामध्ये बेकादेशीर बांधकाम प्रकरणी पाठबळ देत आहे.
याविरोधात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या निवासस्थानी आज थाळीनाद आंदोलन करुन आयुक्तांना चप्पल बूट हार भेट देणार होतो. मात्र तत्पूर्वीच निगडी पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सचिन काळभोर यांनी दिली आहे.