पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या काळेवाडी येथील अनधिकृत बांधकामावर नुकतीच कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ६ आरसीसी बांधकाम व ७ पत्राशेडवर कारवाई करण्यात आली.

काळेवाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम होत असल्याची तक्रार क्षेत्रीय कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. त्याची दखल घेत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली काळेवाडीमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख, कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे यांच्या नियंत्रणाखाली कारवाई करण्यात आली.
यावेळी सुमारे ३१४८ चौरस मीटर बांधकाम पाडण्यात ‘आले. ‘ब’ प्रभाग येथील धडक कारवाई पथकातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक व मनपा कर्मचारी, २० मनपा पोलिस, तसेच वाकड पोलिस स्टेशनचे २ पोलिस निरीक्षक, 3 पोलिस उपनिरीक्षक, १० पोलिस कॉन्स्टेबल, महाराष्ट्र सुरक्षाबल २६ कर्मचारी यांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. तसेच ३ जेसीबी व १० मजूर यांची कारवाईमध्ये मदत झाली.






















Join Our Whatsapp Group