पिंपरी (Pclive7.com):- दापोडी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रभू येशू ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी आयोजित उत्सवात गीत गायन स्पर्धा झाली. विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली व लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.

दापोडी येथील संजय ऊर्फ नाना काटे युवा मंचाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाचे उद्घाटन संजय ऊर्फ नाना काटे व रेव्हरंड वसंत पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. उत्सवाची सुरुवात गीत गायन स्पर्धेने झाली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील लहान मुलांनी गीत गाऊन आनंद साजरा केला. या स्पर्धेत विविध चर्च व संस्थांनी सहभाग घेतला.
यावेळी येशू ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित घेण्यात आलेल्या गीत गायन स्पर्धेत न्यू सुवर्ता तारण मंडळीने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेत द्वितीय क्रमांक होम किड्स स्कूल तर तृतीय क्रमांक यहोवा मराठी चर्चने मिळविला. स्पर्धेतील विजेत्यांना माजी नगरसेवक संजय काटे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये एकूण १५ संघानी सहभाग घेतला. यावेळी विशाल पंडित, संगीता जाधव, अमृता घोलप, प्रशांत कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत बाराथे यांनी केले तर सुरेश काटे यांनी आभार मानले.





















Join Our Whatsapp Group