भोसरी (Pclive7.com):- दहावीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना भोसरीत घडली आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवून शाळेच्या मुख्याध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुष दुर्योधन गारळे (वय – १५, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर, हितेश शर्मा (वय-४०, दिघी रस्ता, भोसरी) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. याप्रकरणी आयुषच्या आईने भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी दिघी रस्ता येथील प्रियदर्शनी इंग्रजी शाळेचे हितेश शर्मा हे मुख्याद्यापक आहेत. आयुष दंगामस्ती करतो, अभ्यास करत नाही. त्याला परीक्षेला बसू देणार नाही. शाळेतून काढून टाकेन, अशी धमकी ते आयुषला देत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून आयुषने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार आयुषच्या आईने केली आहे. त्यानुसार, मुख्याध्यापकांवर भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भवारी करत आहेत.






















Join Our Whatsapp Group