पिंपरी (Pclive7.com):- बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी. तसेच पेटा संघटनेवर बंदी घालावी, या मागण्यांसाठी बैलगाडा मालकांसह शौकीन आक्रमक झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील चाकण येथे पुणे-नाशिक महामार्ग रोखण्यात आले आहे. आज सकाळपासून तळेगाव चौकात सर्वपक्षीय आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत.
या आंदोलनात बैलगाडा मालक बैलगाड्यांसह सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपासह सर्वपक्षीय या आंदोलनात सहभागी झाले आहेत. बैलगाडा शर्यतीवरील बंदी कायमस्वरूपी हटेपर्यंत राज्यभर लढा सुरु ठेवण्याची हाक यावेळी देण्यात आली.
दरम्यान, या आंदोलनामुळे पुणे नाशिक महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या दोन ते तीन किमी पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खेडचे शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, सर्वपक्षीय कार्यकर्ते शेतकरी बैलगाडा चालक मालक मोठ्या संखेने आंदोलनात सहभागी झाले आहेत.






















Join Our Whatsapp Group